For Mother's Day, Sandhya Taksale (editor, Pratham Books) shares her memories of her mother. When Sandhya thinks of her mother, her enthusiasm and love for life comes to her mind - for teaching, learning,reading, sports, cooking, etc. "There are so many things which my mother taught me by setting an example, sharing joy and fun of learning new skills. I have no words to express the gratitude and wish her long and meaningful life.", says Sandhya.
आई म्हटल्यावर पटकन अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाच्याच त्या तशा येतात. भावनांचे विविध रंग उमलतात, उजळतात.
Image may be NSFW.
Clik here to view.
या अनेक गोष्टीतून माझ्याबाबत म्हणाल तर सर्वात अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे आईचा मूर्तीमंत उत्साह. प्रत्येक गोष्टीतला! शिकणे, शिकवणे, पुस्तकं, खेळ, प्रवास, सण-वार, स्वयंपाक, सगळ्यात पुढे. ती शाळेत शिक्षिका होती. ते तर तिच्या आवडीचं क्षेत्र. निवृत्त झाल्यावरही तिनं पुढे ११ वर्ष वनस्थळी या स्वयंसेवी संस्थेत काम केलं. मोबदला न घेता. बालवाडी शिक्षिकासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यासाठी साध्या लाल एसटी ने खेड्यापाड्यात प्रवास केला. वयाच्या ६० ते ७० या वर्षातला तिचा हा उत्साह थक्क करणारा होता. याच काळात तिनं बालशिक्षणासाठी उपयोगी ठरेल असं एक पुस्तकं युनिसेफच्या उपक्रमाखाली मराठीत अनुवादित केलं.
Clik here to view.

खरं तर अनेक बाबतीत ती काळाच्या पुढे होती. तिचे वडील वकील होते शिवाय खंदे वाचक. त्यांच्या घराच्या भिंती इंग्रजी आणि मराठी पुस्तकांनी गच्च भरलेल्या होत्या. एवढा वारसा मला आई वडील आणि आजोबा यांच्याकडून मिळाला याचा मला फार आंनद वाटतो. आईच्या काही गोष्टी सांगितल्या, तर विश्वास बसणार नाही कदाचित. पण हे खरं आहे आणि तितकंच अचंबित करणारं! लग्न झालं तेंव्हा तिचं फक्त कॉलेजचं एक वर्ष पूर्ण झालं होतं. नंतर तिनं सगळं शिक्षण तुकड्या तुकड्यात पूर्ण केलं. आधी बीए मग एमए मग बीएड. जिद्द किती, तर तिचा थोरला मुलगा म्हणजे माझा भाऊ जेंव्हा एमेस्सी करत होता तेंव्हा ती बाहेरून एमए. करत होती. शिवाय हे सर्व नोकरी करता करता.! तो काळ असा होता जेंव्हा बऱ्याच स्त्रिया फक्त गृहिणी म्हणूनच राहात. त्या काळात आई अनेक चाकोरी बाहेरच्या गोष्टी करायची. ती सायकल चालवायची, तिला पोहायला यायचं, ती बेडमिन्टन खेळायची, महिला मंडळातील इतर बायकांना तिनं खेळात ओढलं. कहर म्हणजे वयाच्या ७० व्या वर्षी निव्वळ हौस म्हणून ती ल्युना चालवायला शिकली. रस्त्यावर चालवायची नव्हतीचं तिला पण नवं काहीतरी शिकायची उर्मी मात्र जबरदस्त. किती दुर्मीळ गुण आहे हा!
माझा स्वतःचा जेंव्हा कधी उत्साह आटतो; कंटाळा येतो तेंव्हा लाजल्यासारखं वाटतं. कारण आज ८६ व्या वर्षीही तिचा उत्साह आणि तजेला टिकून आहे. अशा कितीतरी गोष्टी तिनं आदर्श म्हणून समोर ठेवल्या आहेत की कृतज्ञ वाटून मन भरून येतं.
**********
Read other posts written by PBees and guest bloggers about their mothers and motherhood:
Dhwani Yagnaraman's post dedicated to her mother AnandiMother’s Day, the Nightingale and her Song Book - by Mala Kumar
My Mother is the Most Beautiful Woman in the World! - by Purvi ShahMy Mother's Gifts - by Maya Hemant Krishna
माँ से मिले कई स्वाद - by Manisha Chaudhry
मूर्तिमंत उत्साह - by Sandhya TaksaleImage may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.
Clik here to view.
Image may be NSFW.Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.

Clik here to view.
